जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात संपन्न.
प्रत्येक मराठी नागरिकाला अभिमान वाटावा असा आजचा दिवस ज्येष्ठ कवी लेखक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त आजचा दिवस सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. वि. वा. शिरवाडकर यांनी मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले त्यांच्या नटसम्राट नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला, तर विशाखा सारख्या काव्यसंग्रहाने तरुणांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवली. कुसुमाग्रज यांनी मराठीला केवळ बोलीभाषा न ठेवता ती ज्ञानभाषा व्हावी यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.
मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना कॉलेज मधील प्राध्यापक, प्राधापकेत्तर कर्मचारी, आणि विद्यार्थां उस्फूर्तपणे कार्यक्रमात सहभाग झाले.