श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूर विभागीय बॉक्सिंग (पुरुष) स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.यामध्ये डॉ.जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालय जयसिंगपूर चा खेळाडू साईश मठपती याने 70 ते 75 kg गटात 🥈द्वितीय क्रमांक (सिल्वर मेडल)🥈 मिळवून शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. सदर खेळांडूस संस्थेचे चेअरमन डॉ.विजय मगदूम, व्हा.चेअरपर्सन एड. डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ. एस. एस. आडमुठे यांचे प्रोत्साहन तसेच प्राचार्य डॉ. के. एस. हरिशानंद,डीन-स्टुडंट वेल्फेअर प्रा. पी. पी. पाटील यांचे सहकार्य व शारीरिक शिक्षण संचालक एन. के.पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर आयोजित शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभागीय बॉक्सिंग (पुरुष) स्पर्धेत डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालय, जयसिंगपूरचे साईश मठपती यांनी 70–75 kg गटात द्वितीय क्रमांक (सिल्वर मेडल) मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.