Skip to content

Dr. J J Magdum Trust’s (No. E/902)

Dr. J. J. Magdum College Of Engineering, Jaysingpur

An Autonomous Institute( From 2024-25)

‘NAAC ‘A’ Grade Institute’

Approved by A.I.C.T.E., New Delhi, Recognized by Govt. of Maharashtra (DTE) & Affiliated to Shivaji University, Kolhapur

Dr. J.J. Magdum College Of Engineering, Jaysingpur

An Autonomous Institute( From 2024-25)

‘NAAC ‘A’ Grade Institute’

Menu

डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये एन.एस.एस. दिवस उत्साहात साजरा

डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये एन.एस.एस. दिवस उत्साहात साजरा

जयसिंगपूर- येथील डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टच्या डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील राष्ट्रीय सेवा विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २४ सप्टेंबर, २०२५ रोजी एन.एस.एस. दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांमध्ये स्वच्छता, समाजसेवा व पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
प्रा. पी. पी. पाटील (डीन, स्टुडंट्स वेल्फेअर) यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सरस्वती पूजन करून एन.एस.एस. युनिट-2025 चे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. ए. चौगुले यांनी एन.एस.एस.ची स्थापना, उद्दिष्टे व विद्यार्थ्यांवर त्याचा सकारात्मक प्रभाव याबाबत माहिती दिली.
मुख्य अतिथी डॉ. पी. एस. पांडव (उप-कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, एन.एस.एस. केवळ स्वच्छता व समाजसेवेपुरते मर्यादित नाही, तर विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण विकास तसेच नेतृत्वगुणांची संधी मिळते. त्यांनी उदाहरणादाखल सांगितले की, गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता व वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांमध्ये विद्यार्थी तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून वास्तविक बदल घडवतात. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना नियमितपणे समाजसेवा उपक्रमात सहभागी होण्याचे, पर्यावरण संवर्धनाचे आणि स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी एन.एस.एस.च्या उपक्रमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. आभार प्रदर्शन डॉ. ए. एम. मोरे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हा.चेअरपर्सन डॉ. ऍड. सोनाली मगदूम, आणि कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे यांचे प्रोत्साहन लाभले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि एनएसएस स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.